अर्थविश्वबाजारभावमहाराष्ट्रयोजना

अखेर “या” 2 जिल्ह्यांचा पीकविमा वाटप सुरू; सोयाबीन तूर, कापूस सह या पिकांचे लोक लाभार्थी…

पिक विमा संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण अपडेट आहेत. लातूर जिल्ह्यातील खरीप 2021 पिक विमा च्या संदर्भातील व दुसरा जालना जिल्ह्याच्या फळपीक विमा संदर्भातील. या दोन जिल्ह्यातील पीक विमा वाटप सुरू झाले आहे. अतिवृष्टीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झाले. लातूर मध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम खूप अत्यल्प प्रमाणात आली होती. यामुळे पिक विमा मिळेल की नाही अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती.

सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे लोक लाभार्थी –

या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड पडलेला यासाठी एक अधिसूचना काढण्यात आलेली होती. यामध्ये सोयाबीन या पिकासाठी 60 मंडळांना तर कापूस आणि तूर या पिकांसाठी काही मंडळांनी पात्र ठरवण्यात आलेलं होत. या अधिसूचना योजनेच्या माध्यमातून पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यासाठी 25 टक्के च्या प्रमाणामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झालेले.

यामध्ये सोयाबीन साठी हेक्‍टरी 15 ते 18 हजार रुपये, तुरीसाठी 22 ते 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर तर कापूस या पिकासाठी 25 ते 28 हजार रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. पिक विमा वाटप होत असताना अग्रीम रक्कम म्हणून 25 टक्के रक्कम ही तुरीच्या पिकासाठी दिली जात आहे.

25 टक्केसह उर्वरित रक्कम लवकरच मिळणार –

आता 15 डिसेंबर शेवटची तारीख आहे. तुरीचे पीक कापणी प्रयोग होतील, प्रयोग झाल्यानंतर सरासरी उत्पादकता काढली जाईल व यानंतर पात्र मंडळी ठरवली जातील. नुकसान डेटा काढून त्या ठिकाणी नुकसान जास्त असेल तर जे नुकसान भरपाईची रक्कम 25 टक्के आहे ती समायोजित करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना त्यावेळेस दिली जाईल. त्यामुळे आलेला विमा फायनल विमा नाही.

25 टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे –

सोयाबीन साठी सर्वच्या सर्व मंडळी मात्र करण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम होते व त्यांचे पुर्णपणे सर्वे झाले त्यांचा पिक विमा मंजूर झालेला आहे. त्यांना पिक विमा त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण येत आहे आणि बाकीच्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी मंडळासाठी ज्या जिल्ह्याच्या अधिसूचना काढल्या होत्या त्यांना देखील 25 टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि क्रेडिट होत आहे. आलेला विमा कोणता जमा होत आहे असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले होते. तर ती प्रोसेस अशी होत आहे.

दुसरे महत्त्वाचा तो म्हणजे जालना जिल्ह्या –

जालना जिल्ह्यासाठी मोसंबी या पिकासाठी फळपीक विमा मंजूर झालेला आहे. आणि हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झाला आहे.

IFSC व account नंबर चेक करा –

शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना म्हणजे आयएफसी कोड आणि अकाउंट नंबर बरोबर आहे का विमा कंपनीचा प्रतिनिधी शी संपर्क करून पाहण्याचा प्रयत्नकरा. आकाऊंट नंबर चुकीचा असेल तर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या खात्यावर पीक विमा आलेला नसेल तर आपल्याला लवकर रक्कम मिळण्यासाठी मदत होईल.

 सौजन्य - मी ई शेतकरी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button