अर्थविश्वमनोरंजनमहाराष्ट्रयोजनाव्यवसाय

खरेदीखत म्हणजे काय? जमिनीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी नक्की वाचा | What is KharediKhat in Marathi

खरेदीखत (Land purchase Agreement) म्हटलं की नावातच समजतं की खरेदी करण्याविषयीचं कागदपत्र मग ते शेतीचे असो की घर बांधण्यासाठी जमिन खरेदी (Sell and Purchase of Lands) व्यवहाराचं असो! असा हा शब्द आपल्या कानावर बऱ्याच वेळा पडत असतो. परंतु खरेदीखत (Kharedikhat) का करतात? ते नेमकं असतं तरी काय? त्याचा फायदा तरी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधू..

खरेदीखत म्हणजे काय? What is Land Sell Agreement?

जमिनीचा व्यवहार करताना जी रक्कम जमीन घेणारा (Purchase of Farm) आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली आहे. ती रक्कम देऊन व्यवहार पूर्ण होतो आणि त्याचा पुरावा किंवा आपल्याकडे नोंद राहावी म्हणून खरेदीखत करतात. खरेदीखत (Land purchase Agreement) झाल्यावर त्या संबंधित जमिनीचे मालकी हक्क हस्तांतरीत केले जातात. थोडक्यात एखादी जमीन खरेदी केल्याच्या नंतर तिचा व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजेच खरेदीखत असतं. जमिन खरेदी-विक्री यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. हे बदल करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असतात.

जमीन खरेदी-विक्री करताना तुम्हाला जमिनीचा सध्याचा बाजारभाव काय चालू आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून खरेदीखतासाठी सर्वप्रथम मुद्रांक शुल्क (Stamp duty) हे काढून घ्यावे लागते. यासाठी ज्या गाव-भागामध्ये जमीन आहे त्या क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन (Evaluation) करून मुद्रांक शुल्क काढून घ्यावे. दुय्यम निबंधक हा मूल्यांक शुल्क काढून देतात.

मुद्रांक शुल्क काढल्यावर दुय्यम निबंधक खरेदी खत दस्तऐवजासाठी आवश्यक नोंदणी शुल्क व कागदपत्रे कार्यालयीन खर्चाची माहिती देतात. तसेच खरेदी अथवा विक्री करावयाच्या जमिनीचे सर्वे नंबर (Survey number), जमिनीचा प्रकार, जमिनीच्या मालकाची नावे, जमिनीचे क्षेत्र, जमीन खरेदी करण्याचे व विकणाऱ्याचे प्रयोजन इ. सर्व दुय्यम निबंधकाने (Secondary registrar) ठरवून दिलेल्या मुद्रांक शुल्कावर नमूद करावे लागते.

खरेदीखत करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

?????

You have to wait 30 seconds.

राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे कापूस बाजारभाव

शेतकरी मित्रांनो खरेदीखत करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.

1 2 3Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button