अर्थविश्वट्रेंडिंगमहाराष्ट्र

SBI खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाचे! हे काम करा, नाहीतर अकाऊंट वापरता येणार नाही | Bank Account Holder Update

SBI Reminder For Customers: स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे.

जर तुमचे देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये खाते असेलत तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे.

याद्वारे करोडो ग्राहकांना PAN Card Aadhaar Card Link करण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय आमची बँकिंग सेवा वापरायची असेल तर पॅन आधार लिंक करण्यास बँकेने सांगितले आहे.

PAN Card ला आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. जर ग्राहकांनी केली नाही तर त्यांचे पॅन कार्ड निष्क्रीय होईल. यामुळे एसबीआय खातेधारकांना बँकेच्या सेवा देखील वापरता येणार नाहीत, असे एसबीआयने म्हटले आहे.

पॅन आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर ही निश्चित करण्यात आली होती परंतु नंतर ही तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली.


आधार – पॅन लिंक करण्यासाठी खालील करा

finger down

कसे कराल आधार-पॅन कार्ड लिंक…. (How to link PAN card to Aadhaar online Marathi)१) सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत साइटवर जावे लागेल किंवा तुम्ही गुगल सर्चमध्ये https://www.incometaxindiaefiling.gov.in/home टाइप करू शकता.

२) या लिंकवर जाताच तुम्हाला होमपेजच्या डाव्या बाजूला आधार लिंकचा पर्याय दिसेल.

3) तुम्हाला लिंक आधार पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल, त्यानंतर आधार कार्डमध्ये नाव प्रविष्ट करा आणि मोबाइल क्रमांक भरा.

4) तुमच्या आधार कार्डमध्ये फक्त तुमचे जन्मवर्ष लिहिलेले असेल, तर तुम्ही आधारमध्ये i have only birth year हा पर्याय निवडावा. त्याच्या अगदी खाली, ‘Agree to Validate’ हा पर्याय निवडा.

5) पर्याय निवडल्यानंतर, वर दिलेले सर्व तपशील एकदा नीट वाचा आणि नंतर आधार या लिंकवर क्लिक करा आणि तुमचे आधार पॅन कार्ड लिंक होईल.


आधार – पॅन लिंक करण्यासाठी खालील करा

finger down

हे पण वाचा –

1 2Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button