अर्थविश्वबाजारभावमहाराष्ट्रयोजना

सोयाबीन भाव वाढणार? आठवड्यात कशी राहिली सोयाबीनची आवक? बघा । Soybean Market Analysis

Soyabin bajar Bhav : देशांतर्गत बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर अधिक आहेत. मात्र शेतकरी बाजारात मर्यादीत पुरवठा असल्यानं दर तेजी-मंदीनंतर ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान फिरतात आहेत.

पुरवठा मर्यादा होत असला तरी उद्योगांची गरज पूर्ण होतेय. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव नाहिये. गेल्या आठवड्यात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तसे स्थिर राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलं आहे.

शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा.

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशातील सोयाबीन दर तेजीत आहेत. सोयापेंडचे दरही अधिक आहेत. सरकार सोयापेंड आयातीला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देशातील सोयाबीन बाजारात दर ६ हजार ३०० ते ७ हजारांच्या दरम्यान फिरत आहे. मागील आठवड्यााचा विचार करता सोयाबीन दरात २०० ते ४०० रुपयांची तेजी-मंदी राहिली. मात्र सर्वसाधारण दर ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिला.

सोयापेंडचे दरही कमी-जास्त होत राहिले. व्यापारी सुत्रांच्या मते सोयाबीनचे दर जास्त असल्याने स्टॉकिस्ट बाजारात सक्रिय झाले नाहित. त्यांची खरेदी अद्यापही सुरु झाली नाही. मात्र दुसरीकडे शेतकरी कमी माल बाजारात आणत असल्याने आवकेचा दबाव बाजारात नाहिये. त्यामुळे दरावर फारसा परिणाम होताना दिसत नाही आणि दर काही प्रमाणात तुटल्यानंतर पुन्हा आधीच्या पातळीवर स्थिरावत आहेत.

सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनची आवक जवळपास उद्योगाच्या गरजेनुसारच होताना दिसत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारातील सोयाबीन आणि सोयापेंड दराचा देशातील बाजारावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. तसेच ऐन हंगामात आवक कमी असून सर्वसाधरण दरही साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. मागील आठवड्यात सोयाबीन बाजार ६ हजार २०० ते ६ हजार ६०० रुपये आणि सर्वसाधारण दर ६ हजार ५०० रुपायांदरम्यान फिरत होता.

मागील आठवड्यात महाराष्ट्रात सोयाबीनचा सरासरी दर ६ हजार १०० ते ६ हजार ५०० रुपये राहिला. मध्य प्रदेशात ६ हजार ते ६ हजार ७०० रुपये आणि राजस्थानमध्ये ६ हजार ते हजार ५०० रुपये दर मिळाला. प्लांट्सचे दर मध्य प्रदेशात ६ हजार २७५ ते ६ हजार ६०० रुपये, महाराष्ट्रात ६ हजार ६५० ते ६ हजार ८०० रुपये आणि राजस्थानमध्ये ६ हजार ४०० ते ६ हजार ६५० रुपयांदरम्यान राहिले.

प्लांट्सच्या दरातही मागील आठवड्यात तेजी-मंदी होती. मध्य प्रदेशात प्लांट्सचे दर ६ हजार २७५ ते ६ हजार ६०० रुपये, महाराष्ट्रात ६ हजार ६५० ते ६ हजार ८०० रुपये आणि राजस्थानमध्ये ६ हजार ४०० ते ६ हजार ६५० रुपयांदरम्यान राहिले.

आता आठवडाभरात सोयापेंडचे दर काय होते ?

मागील आठवड्यातही सोयापेंडची मागणी सामान्य राहिली. मात्र सोयाबीन आवकही कमीच असल्याने गाळपही मर्यादीत होतंय. त्यामुळे सोयापेंडच्या दरातही तेजी-मंदी सुरु आहे. मध्य प्रदेशात सोयापेंडचे दर प्रतिटन ५२ हजार ते ५६ हजार रुपयांच्या दरम्यान राहिले. महाराष्ट्रात सोयापेंडचे व्यवहार ५६ हजार ते ६० हजार ५०० रुपयाने व्यवहार होतायेत. राजस्थानमध्ये दर ५४ हजार ५०० रुपये ते ५५ हजार ३०० रुपये दर मिळतोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button