मनोरंजनमहाराष्ट्रयोजना

Sheli gat vatap yojana : फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 75% अनुदानावर 10 शेळी 1 बोकड शेळी गट वाटप योजनेचा लाभ

शेळी गट वाटप योजना : शेतीला जोडधंदा असेल तर शेतकरी बांधवांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही कारण शेतीसाठी दुग्धव्यवसायात असो अथवा पशूपालन यासारख्या व्यवसाया मधून दररोज पैसा कमावला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिक मदत मिळते. हीच बाब विचाराधीन ठेवून राज्य सरकार शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी एक प्रकारे आर्थिक मदत देऊ करते. (Sheli gat vatap yojana) अशाच काही योजनांत पैकी एक योजना ती म्हणजे शेळी गट वाटप योजना ही आहे तर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे 10 शेळ्या आणि एक बोकड इत्यादी वाटप करण्यात येते व या वर 75 टक्के अनुदान सुद्धा मिळत असते.

तर शेतकरी मित्रांनो सदर योजना ही कोणत्या जिल्ह्यासाठी आहे व किती तारखेपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे त्याबद्दल अधिक माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा. (Sheli gat vatap yojana) या योजनेअंतर्गत १० शेळ्या आणि १ बोकड आणि १०० कुकुट पक्षांचे वाटप या शेळी गट वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. तर या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा आणि त्याची कागदपत्रे याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजनेचा अंतर्गत लाभार्थ्यांना 10 शेळ्या आणि १ बोकड अशा गटाचे वाटप करण्यात येणार आहे, त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. (Sheli gat vatap yojana) या योजनेसाठी 2021-22 या वर्षाकरिता 67 लाख 21 हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.  या योजनेकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनिल गडाख यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख (Last date to apply for Sheli gat vatap yojana):

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक शेळी गट वाटप योजनेअंतर्गत १० शेळ्या आणि १ बोकड यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर २०२१ ही आहे.

एवढे मिळेल अनुदान (Subsidy for Sheli gat vatap yojana) :

या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान दिले जाते, त्यामध्ये एका शेळी मागे आठ हजार रुपये तर ११ हजार रुपये प्रती बोकड अनुदान दिले जाईल.

असा करावा अर्ज (How to apply for Sheli gat vatap yojana):

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या जवळच्या पंचायत समिती मध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये जमा करावयाचा आहे या अर्जाचा नमुना शेवटी दिलेल्या लिंक वर जाऊन आपण पाहू शकता.

शेळी गट वाटप योजनेचा अर्ज नमुना व जिल्ह्याचे नाव पाहण्यासाठी

?? 30 सेकंड थांबून खाली येणाऱ्या लिंक वर क्लिक करा??

You have to wait 30 seconds.



1 2Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button