ट्रेंडिंगमहाराष्ट्रयोजनाव्हायरल

सातबारा उतारा होणार बंद! राज्य सरकारचा मोठा निर्णय । Satbara Utara Honar Band । सर्व ठिकाणी बंद होणार का? बघा

Satbara Utara Honar Band: नमस्कार कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी आजची बातमी अतिशय महत्वाची असणार आहे. राज्यातील सातबारा उतारा होणार बंद राज्य शासनाचा हा मोठा निर्णय जाहीर झाले आहे. तर खरोखरच सातबारा उतारा बंद होणार आहेत का? आणि जर सातबारा(७/१२) बंद झाला तर त्या जागी काय येईल तसेच कोणत्या जिओळ्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरु झाली आहे, नेमका हा जो निर्णय घेतला आहे तो कुठे आणि कसा लागणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. त्या साठी हा लेख संपूर्ण वाचा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.

जमिनीचे सातबारा बंद झाला आहे का ?

शेतकरी बांधवांनो, राज्यात वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्यानं सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतला आहे.


शेतकऱ्यांना मिळणार २ लाखाचा विमा! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-2022 संपूर्ण माहिती


सातबारा(७/१२) Utara Maharashtra Online 2022

वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी शेतजमीनच उरलेली नाही. अनेक शहरांतील शेतजमीन जवळपास संपली आहे. त्यामुळे या शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातबाऱ्यांचं प्रॉपर्टी कार्डमध्ये रुपांतर झालं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सात बारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणुकीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व शहरांतील सात बारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागानं घेतला आहे.

सातबारा उतारा ऑनलाइन

या निर्णयाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली, मिरज, नाशिकपासून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येईल. सिटी सर्व्हे झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणं आवश्यक आहे. तरीसुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत.


वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?


सिटी सर्व्हे झाला. पण सातबारा उतारा नाही, अशाही काही जमिनी आहेत. त्यातून अनेक घोळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्याही वाढत आहे. या सर्व प्रकारांना रोखण्याच्या हेतूनं शेतीसाठी वापर होत नसलेल्या जमिनींचा सात बारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमी अभिलेख  विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

कोणत्या शहरांत अंमलबजावणी?

भूमी अभिलेख विभागानं घेतलेला निर्णय सुरुवातीला काही शहरांत प्रायोगिक तत्वावर अंमलात आणण्यात येणार आहे. नाशिक, सांगली, मिरज आणि पुण्यातील हवेली तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर केली जाणार आहे. त्यानंतर राज्यात लागू करायचा की, काय याबाबत विचार केला जाणार आहे, असे समजते.

तर शेतकरी मित्रांनो, सातबारा कुठे बंद होणार आहेत. आणि कशा पद्धतीने बंद होणार आहे त्या पाठीमागचा नेमकं कारण काय आहेत. भूमी अभिलेख विभागाने हा नेमकं निर्णय का घेतला या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळालीच असेल, आणि हि माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर विना टेन्शन हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेयर करायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकरी बांधव आणि तुमचे नातेवाईक व मित्र मैत्रिणी यांच्या मनात असलेले सातबारा विषयीचे प्रश्न सुटतील. ?‍??‍? धन्यवाद!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button