अर्थविश्वट्रेंडिंगमहाराष्ट्रयोजना

शेतकऱ्यांनो ‘हे’ काम लवकर करा, नाहीतर पैसे अडकतील ; पीएम किसान सन्मान निधीचा ११ वा हफ्ता ‘असा’ मिळवा

पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर ई-केवायसी करता येते. वेबसाइटवर, तुम्हाला उजव्या बाजूला e-KYC चा कॉलम दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल.

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेले लोक पुन्हा एकदा पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकार आता पीएम किसान सन्मान निधीचा 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता खात्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे 12 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6,000 रुपये हस्तांतरित करते. सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी या योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र तसे होऊ शकले नाही. केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी दिले जाते.


PM Kisan KYC करण्यासाठी खालील बटणवर टच करा

finger down

हे काम आधी करा

पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर ई-केवायसी करता येते. वेबसाइटवर, तुम्हाला उजव्या बाजूला e-KYC चा कॉलम दिसेल, जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल. हे भरून तुमचे ई-केवायसी केले जाईल, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी पुढील हप्त्यापूर्वी ते पूर्ण करून घ्यावे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत 10 हप्ते मिळाले 

केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांना हस्तांतरित केले आहेत. 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये कोट्यवधी शेतकर्‍यांना हस्तांतरित केले होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी देशभरातील 10.09 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता जारी केला. यावेळी त्यांनी देशभरातील अनेक शेतकरी उत्पादक संघटनांशी (एफपीओ) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

हे पण वाचा –


PM Kisan KYC करण्यासाठी खालील बटणवर टच करा

finger down

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button