मनोरंजनमहाराष्ट्रयोजनाव्यवसायव्हायरल

३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज वाटप सुरू फक्त या शेतकऱ्यांना मिळणार अटी,पात्रता crop loan

बिनव्याजी पीककर्ज योजना | पंजाबराव कृषी व्याज सबसिडी योजना २०२१-२०२२  documents & Information

योजनेचे नावपंजाबराव कृषी व्याज सबसिडी योजना २०२१-२०२२ | बिनव्याजी पीककर्ज योजना
कोणी सुरु केलीराज्य सरकारने सुरु केली
योजना चा उद्देशयोजनेचे मुख्य लाभार्थी शेतकरी आहेत . हंगामी पिकाच्या पेरणीसाठी आर्थिक मदत करणे व व्याज दर कमी करणे हा मुख्य उद्देश आहे.
कधी सुरु झाली1990 रोजी

New Update :

ज्या शेतकऱ्याने त्यांच्या कर्जाची विहित मुदतीमध्ये परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याजाची रक्कम परतफेड म्हणून जमा होणार आहे.

शासन निर्णय :

सन २०२१-२२ या वर्षात डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत (२४२५ १००९)३३ अर्थसहाय्य खाली रू.१०४००.०० लाख वितरणासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने ६०% म्हणजेच रू. ६२४०.०० लाख (रूपये बासष्ट कोटी चाळीस लाख) एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

पंजाबराव कृषी व्याज सबसिडी योजना २०२१

गेल्या काही वर्षापासून मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोदी सरकार कसोशीने प्रयत्नशील आहे त्यानंतर आता ठाकरे सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कृषी कायद्या विरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत आता 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बिनव्याजी पीककर्ज योजनेचा लाभ

  • योजनेचे मुख्य लाभार्थी शेतकरी आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी असे कोणतेही विशेष निकष नाहीत.
  • कोणत्याही उत्पन्न गटातील कोणतेही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ही योजना केवळ राज्यातील ग्रामीण भागातच लागू आहे.
  • ३ लाख मर्यादेपर्यंत पीककर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने ३ % व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के ०% व्याज दराने उपलब्ध होणार आहे.

सध्या शेतकऱ्यानी रू. ३ लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर बँकातर्फ ६ % व्याज आकारण्यात येते व या कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास राज्य शासन व केंद्र शासन यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या व्याजदरातील सवलतीचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल तपशील पुढील प्रमाणे आहे.

तीन लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी देण्यात येणार राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत एक लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी तर तीन लाखापर्यंत कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचे ठाकरे सरकारने सांगितले.

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटपाची प्रक्रिया करावी लागणार. कर्जमाफी योजनेचा फायदा आणि मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना  सहकार विभागास देण्यात आल्यात.त्यासाठी तालुका जिल्हा समितीने तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही यावेळी सहकार मंत्र्यांनी दिल्यात.

बिनव्याजी पीककर्ज योजना | पंजाबराव कृषी व्याज सबसिडी योजना २०२१

शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटपाची प्रक्रिया  पूर्ण करावी. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांना केसीसी रूपे डेबिट कार्ड वितरीत करून त्यांना एटीएम द्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच कर्ज माफी न झाल्यास शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा झाला तरच शेती संदर्भात नियोजन करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे .

त्यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याच्या माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्यात.


हे पण वाचा –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button