ट्रेंडिंगबाजारभावमहाराष्ट्रयोजनाव्हायरल

कांद्याच्या भावात कमालीची घसरण! अहमदनगर मध्ये फक्त 4 रुपये किलो विकला गेला कांदा, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

भारतात कांदा एक प्रमुख पीक आहे, याची लागवड संपूर्ण भारतात थोड्या मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र कांदा लागवडीत आणि उत्पादनात देशात अव्वल आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादणासाठी ओळखला जातो. विशेषता नाशिक जिल्हा कांदा उत्पादणासाठी जगात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सर्वात जास्त कांदा पिकावर निर्भर आहेत, पण यावर्षी कांद्याला चांगलेच ग्रहण लागले आहे. अतिवृष्टी मुळे कांद्याची रोपे मेलीत, तसेच लाल कांदा त्यामुळे चांगलाच प्रभावित झाला.

आणि आता कांद्याच्या भावात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. अहमदनगर मध्ये कांद्याचा भाव तर हा चांगलाच जमीनदोस्त झाल्याचे चित्र समोर आले आहे. अहमदनगर मधील बाजारपेठेत 26 तारखेला कांदा हा 4 रुपये किलो म्हणजे 400 रुपये क्विंटल एवढ्या किमान किमतीत विकला गेला, यावेळी बाजारपेठेत जवळपास 2400 क्विंटल कांद्याची आवक होती.

आता प्रश्न उभा राहिला आहे की, सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे स्वप्न पाहत आहे ते फक्त कागदावर मर्यादित आहे की काय? जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 2022 पर्यंतच नाही तर कधीच दुप्पट होणार नाही अशी प्रतिक्रिया आता शेतकरी देत आहेत.

कांदा लागवडीसाठी लागणारा खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते, कांदा लागवडीसाठी जवळपास 16 रुपये किलोमागे खर्च येतो म्हणजे क्विंटलमागे 1600 रुपये खर्च हा येत आहे. आणि कांदयाला जर एवढा कमी भाव मिळत राहिला तर शेतकरी कर्जबाजारीच होईल, तो कधीही संपन्न होऊ शकत नाही. कांदयाला कमीत कमी 3200 रुपय क्विंटलच्या आसपास बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याला यातून चांगले उत्पन्न निघेल असे शेतकरी बांधव आपले मत व्यक्त करत आहेत.

फक्त नगरच नाही तर कांदा किंग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मार्केट मध्ये पण परिस्थिती हि जवळपास सारखीच आहे. 

लासलगाव मार्केट हे आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे ह्या मार्केट मध्ये देखील 26 तारखेला कांद्याला किमान भाव हा 600 रुपये क्विंटल म्हणजे फक्त 6 रुपये किलो एवढा मिळाला. नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्राच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 60 टक्के कांदा उत्पादन घेतले जाते, तिथे जर अशी परिस्थिती आहे यावरून कांदाची राज्यातील परिस्थिती आपल्या लक्षात येईल. लासलगाव मार्केट कांद्याचा भाव ठरवण्यात संपूर्ण देशात महत्वपूर्ण भूमिका निभावते.

सौजन्य – कृषिजागरण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button