खुशखबर! दोन लाखाच्या वरील कर्जमाफी बद्दल मोठी अपडेट! बघा तुमचे नाव, संपूर्ण माहिती (2022)
दोन लाखापेक्षा जास्त असलेले कर्ज कधी माफ होणार? नवीन अर्थसंकल्पामध्ये आहे का याबद्दल काही तरतूद ? आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत नाही आहे त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर मिळणार काय याबद्दलची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत…….
तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यावर दोन लाखापेक्षा जास्त कर्ज आहे .आणि जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात. अशा शेतकऱ्यांसाठी नवीन अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर कर्जाचे मुद्दल व व्याज यांचे एकूण रुपये दोन लाखापेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट म्हणून त्या शेतकऱ्यांची दोन लाखावरील कर्ज माफ होऊ शकते. अशी खाणा-खुणा या नवीन अर्थसंकल्पामध्ये आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या बोलण्यावरून समजत आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे .आणि या योजनेची नेमकी उद्दिष्टे कोणती. त्याचबरोबर या योजनेचा लाभ कसा घ्यावा. आणि या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा .अशी संपूर्ण माहिती या लेखामध्ये तुम्हाला मिळणार आहे .
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !
सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती
- आपला आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा.
- मार्च २०२० पासून बँकांनी आधार क्रमांकासह आणि कर्ज खात्याच्या रकमेसह तयार केलेल्या याद्या सूचनाफलक तसेच चावडीवर प्रसिद्ध केल्या जातील.
- या याद्यांमध्ये शेतकऱ्याच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
- शेतकऱ्यांनी आधार कार्डासोबत आपल्याला दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’ केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.
- पडताळणी नंतर शेतकऱ्यांना कर्ज रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्जखात्यात जमा होईल.
- कर्ज रकमेबाबत व आधार क्रमांकाबाबत शेतकऱ्यांचे वेगळे म्हणणे असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल. समिती त्याबाबत निर्णय घेऊन अंतिम कार्यवाही करेल.

संपर्क:
Helpline Number
Cooperation Marketing and Textiles Department,
358 Annexe, 3rd Floor, Mantralaya, Madam Cama Road,
Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032.
Email ID: contact.mjpsky2019@maharashtra.gov.in
Toll-Free Number: ८६५७५९३८०८ / ८६५७५९३८०९ / ८६५७५९३८१०
One Comment