अर्थविश्वमहाराष्ट्रव्यवसायव्हायरल

Lemongrass Farming: वर्षाचे 12 महिनेही होईल छप्परफाड नफा; ‘या’ गवताची शेती करून लाखो रुपये कमवा!

भारतात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यातच, अरोमा मिशन अंतर्गत सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. यांपैकी एक म्हणजे लेमनग्रासची लागवड. सर्वात महत्वाचे म्हणजे लेमनग्रासची लागवड दुष्काळी भागांतही केली जाऊ शकते.

मिळेल जबरदस्त नफा – लेमनग्रासच्या पानांचावापर परफ्यूम, साबन, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे तेल, मच्छर लोशन, डोकेदुखीचे औषध आणि कॉस्मेटिक्स तयार करताना केला जातो. ही प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये या वनस्पतीच्या तेलाची प्रचंड मागणी आहे.

एका अंदाजानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 700 टन लेमन ग्रास तेलाचे उत्पादन होते. हे तेल परदेशातही निर्यात केले जाते. यामुळे या वनस्पतीची लागवड करून लाखो रुपये नफा कमावण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.

लेमनग्रास वनस्पतींची खासियत – लेमनग्रासची लागवड अगदी नापीक जमिनीतही केली जाऊ शकते. विषेश म्हणजे याच्या लागवडीचा खर्चही फार नाही. शेणखत, लाकडाची राख आणि 8-9 पाण्यातही ही वनस्पती चांगल्या प्रकारे येते.

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे, एकवेळ याची लागवड केल्यानंतर 6 ते 7 वर्षांपर्यंत आपण हे पीक घेऊ शकता आणि दरवर्षीच्या पेरणीपासून मुक्त होऊ शकता.

शेतकरी दर तीन महिन्यांला या वनस्पतीच्या पानांची कापणी करू शकतो आणि वर्षभर चांगला नफा मिळवू शकतो.

विशेष म्हणजे लेमनग्रासची शेती वर्षात केव्हाही केली जाऊ शकते. मात्र, सर्वात अनुकूल महिन्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, फेब्रुवारी-मार्च अथवा जुलै महिना अत्यंत चांगला मानला जातो.

अगदी नापीक जमिनीवरही या वनस्पतीची शेती केली जाऊ शकते. याच बरोबर, पीकाचा विकास चांगला व्हावा यासाठी, या वनस्पतीची लागवड करताना किमान दोन-दोन फुटांचे अंतर ठेवायला हवे.

लेमनग्रासच्या शेतीतून वर्षाचे 12 महिनेही होईल छप्परफाड कमाई…

हे पण वाचा –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button