ट्रेंडिंगमनोरंजनमहाराष्ट्रयोजना

KCC द्वारे शेती व्यवसाय सोबतच या व्यवसायांसाठी देखील मिळेल आता कर्ज ! महाराष्ट्र ‘किसान क्रेडिट कार्ड’ योजनेमध्ये अव्वल !

Kisan Credit Card Loan Update: केसीसी द्वारे शेती व्यवसायांना कर्ज (Loan)देण्यात येत होती. पण आता सरकार ने यामध्ये काही महत्वाचे नवीन बदल घडवून आणले आहेत . कमी व्याजदरांमध्ये शेतकऱ्यांना अधिक कर्ज उपलब्ध करून देणारी ही योजना आहे.


किसान क्रेडिट कार्ड च्या योजनेमध्ये आता नवीन बदल :new update about KCC


मोदी सरकारच्या ‘किसान क्रेडिट कार्ड’ या योजनेमध्ये आता नवीन बदल. ते नवीन बदल असे की आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांना शेतीसाठीच कर्ज मिळायचे .पण आता पशुपालन आणि मासे उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी असा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार वेगवेगळ्या योजना मधून सरकार शेतकऱ्यांची मदतही करत आहे . त्यामधील एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड!

‘किसान क्रेडिट कार्ड’ या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते. आणि शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. आता केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड(KCC) या योजनेमध्ये या योजनेमार्फत शेती व्यवसाय (agriculture )यासोबतच पशुपालन(cattle farming)आणि मत्स्य व्यवसाय (fishery farming )करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्ज उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे .

मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभरात 2 कोटी 60 लाख 59 हजार 687 शेतकऱ्यांनी हे कार्ड काढले आहे .यामध्ये सर्वाधिक ‘किसान क्रेडिट कार्ड ‘काढण्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्राने अव्वल नंबर पटकावला आहे .39 लाख 49 हजार 144 एवढ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याच्या पाठीमागे राजस्थान उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथील शेतकऱ्यांनीही ‘किसान क्रेडिट कार्ड'(KCC)काढलेले आहेत.
New update about kisan credit card)

शेती म्हटले , की जीवाची बाजी !कारण , शेती व्यवसायामध्ये पैशाची गुंतवणूक तर करता येते पण पैसे वापस मिळतील याची कोणतीही गॅरंटी राहत नाही . सर्व निसर्गावर अवलंबून असतात .अशातच जर शेतकऱ्याने सावकारा जवळचे कर्ज घेतले तर कर्जाचा व्याजदरात शेतकरी होरपळून जातो . यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारची ‘किसान क्रेडिट कार्ड’ ही योजना काम करतेय. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमी व्याजदरात शेती व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेले नाही आहे . त्या शेतकऱ्यांना घाबरून जाण्यासारखे काहीही कारण नाहीये . त्यांनी जवळच्या सहकारी किंवा सरकारी बँकेत जाऊन अर्ज करायचा आहे . पंतप्रधान किसान सन्मान निधी(PMKISAN) योजनेलाच हे केसीसी (kisan credit card)जोडले गेले आहे. त्यामुळे याची प्रक्रिया ही खूप सोपी झालेली आहे ज्या बँकेमध्ये तुमचे किसान सन्मान निधी(kisan sanman nidhi yojana) चे हप्ते जमा होतात त्याच बँकेमध्ये याचा अर्ज मिळणार आहे तो अर्ज भरून बँकेत तेथे जमा करावा लागणार आहे त्याकरिता काही कागदपत्रांची देखील आवशक्यता आहे .

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • बँकेमधील केसीसी चा अर्ज पूर्ण भरावा.
  • त्यानंतर त्या सोबत ओळख प्रमाणपत्र जोडावे .
  • ओळख प्रमाणपत्र मध्ये : मतदार, ओळखपत्र ,पॅन कार्ड, पासपोर्ट आधार कार्ड यापैकी कोणतेही असले तरी अर्ज दाखल करता येणार.
  • NO dues प्रमाणपत्र म्हणजे इतर कोणत्याही बँकेत कर्जदार नाहीत असे प्रतिज्ञापत्र व अर्जदाराचा फोटो वरील सर्व कागदपत्रे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागणारा आहेत.

अर्ज कुठे करायचा आणि या योजनेसाठी पात्र कोण आहेत ?


-केसीसी कार्डधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध आहे .
-आता नवीन बदलानुसार पशुसंवर्धन मत्स्य व्यवसायासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
-तुम्ही शेतकरी आपले सुविधा केंद्र म्हणजेच सीएससी(csc) या ठिकाणी देखील अर्ज करू शकता.
-त्यासोबतच सर्व सरकारी, खाजगी, सहकारी आदी प्रादेशिक ग्रामीण बॅंका मध्ये हे केसीसी चे कार्ड तयार केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना व्याजदर किती?

नऊ टक्के किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या रकमेवर शेतकऱ्यांना व्याजदर आहे. यामध्ये सरकार दोन टक्के सवलत देते .जे शेतकरी वेळेवर पैसे परत करतात .अशा शेतकऱ्यांना आणखी तीन टक्के सूट दिली जाते. म्हणजेच पाच टक्के रक्कम शेतकऱ्यांना माफ केली जाते. या मधील फक्त चार टक्केच व्याज दर शेतकऱ्यांना भरावा लागतो.
(Maharashtra rank 1st in kisan credit card)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button