महाराष्ट्रयोजना

कांदा चाळ योजनेचा नवीन जीआर आला; 62.50 कोटीचा निधी जाहीर, असा करा ऑनलाईन अर्ज,

कांदा चाळ उभारणी चा नवीन जीआर आला 62.50 कोटीचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करता येईल आणि महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर काय आहे. या बद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग बघुया

जगाचा विचार करता भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे. त्यातील महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील शेतकरी कांदा या पिकावर अवलंबून आहे. परंतु कांदा या पिकाची योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास या पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊन नुकसान होते.

त्यामुळे अधिक शेतकरी कांदा चाळ बनवून या पिकाची जपवणूक करतात. परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांना कांदा चाळ टाकणी परवडण्याजोगे नसते. त्यामुळे शेतकऱ्याच्या हितार्थ निर्णय घेत केंद्र सरकारने कांदा चाळ योजना साठी नवीन जीआर आणि नवीन अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लवकरात लवकर अर्ज भरून अनुदानाचा लाभ घ्यावा.

शासनाचा नवीन जीआर

14 डिसेंबर 2021 रोजी कांदाचाळ उभारणी प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती. कांदाचाळ उभारणी प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी 62.50 कोटीचा निधीच्या कार्यक्रमास मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर कांदा चाळ योजनेची माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे .आणि महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआरही प्रकाशित करण्यात आलेला आहे.
नवीन जीआर बघण्यासाठी खाल



असा करा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज.

कांदा चाळ योजना ऑनलाईन प्रोसेस खालीलप्रमाणे आहे. खालील पद्धतीने तुम्ही तुमचा कांदा चाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • या पोस्टच्या सर्वात खाली दिलेल्या बटणवर क्लिक करा, व तिथून अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाडीबीटी शेतकरी वेब पोर्टल ओपन होईल.
  • तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • तुम्ही नवीन असाल आणि तुमच्याकडे mahadbt web पोर्टलचा शेतकरी लॉगीन आयडी आणि पासवर्ड नसेल तर मात्र मग तुम्हाला नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लगणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल कि नवीन नोंदणी कशी करावी तर येथे क्लिक करा.
  • लॉगीन झाल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • फलोत्पादन या पर्यायासामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
  • फलोत्पादन योजनेचा ऑनलाइन अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी तुम्हाला घटक प्रकार या पर्यायासाठी इतर घटक हा पर्याय निवडायचा आहे.
  • बाब या पर्यायखाली दिसत असलेल्या चौकटीवर क्लिक करून कांदा चाळ हा पर्याय निवडायचा आहे.
  • आणि सर्वात शेवटी जेवढ्या मेट्रिक टन क्षमतेचे कांदा चाळ हवे असेल ती क्षमता दिलेल्या यादीमधून निवडा.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • योजनेसाठी प्राधान्यक्रमांक निवडा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.


1 2Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button