अर्थविश्वट्रेंडिंगतंत्रज्ञानमहाराष्ट्रयोजनाव्यवसाय

कडबा कुट्टीसाठी सरकार देतंय 75 टक्के अनुदान 2022 | Chaff Cutter [KADBA KUTTI MACHINE] Subsidy 2022

Government Subsidy Schemes for Farmers: शेतकरी बंधूंनो नमस्कार, शेतकरी बंधूंनो पशुधन हे शेती उद्योगातील एक महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे. पशुधनापासून दुग्ध व्यवसायाबरोबरच नवीन उत्पत्ती द्वारे देखील पैसा कमावला जाऊ शकतो. तसेच शेनखत देखील जमिनीसाठी उपलब्ध होते. मात्र उत्पादक जनावर सुदृढ असणे देखील गरजेचे असते.

कडबा कुट्टी अनुदान २०२२ संपूर्ण माहिती

जनावर सुदृढ राहण्यासाठी चारा हा खूप महत्त्वाचा घटक ठरतो. मात्र शेतातून आणलेला चारा जसा चे तसा जनावरांच्या पुढे टाकल्याने चाऱ्याचा फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. (Government Subsidy Schemes for Farmers) हे टाळण्यासाठी बरेच शेतकरी कडबाकुट्टी यंत्राचा अवलंब करतात. मात्र छोट्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टीचा खर्च पेलवत नाही. यासाठी सरकारने कडबा कुट्टी यंत्रावर 75 टक्क्‍यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी यंत्र आणि मोटार घेण्यासाठी किमतीच्या 75 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान जिल्हा परिषदेमार्फत दिले जाते या योजनेचे नाव ‘जिल्हा परिषद अनुदान योजना’ असे आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही अटी घालून दिलेल्या आहेत.


कडबा कुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

finger down

कडबा कुट्टी अनुदान नियम व अटी

  1. योजनेसाठी अर्ज करणारा लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  2. तसेच तो शेतकरी असणे बंधनकारक राहील.
  3. याच बरोबर ज्या शेतकऱ्याच्या नावे अर्ज करावयाचा आहे त्याच्या नावावर दहा एकर पेक्षा जास्त जमीन असता कामा नये. व
  4. त्याच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत आधार कार्ड सोबत संलग्न बचत खाते असावे.
  5. यासाठी विविध कागदपत्रे लागतात जसे की
  6. बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  7. सातबारा उतारा
  8. 8 अ उतारा
  9. घराचे विज बिल आणि
  10. आधार कार्ड झेरॉक्स प्रत

Kadaba Kutti (Chaff Cutter Subsidy) Anudan Yojana

या योजनेबद्दल (Government Subsidy Schemes for Farmers) सखोल माहितीसाठी आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये संपर्क करावयाचा आहे. तसेच योजनेचा अर्ज देखील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने भरता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा.


कडबा कुट्टीसाठी अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

finger down

टीप :सध्या फक्त पुणे जिल्ह्यासाठी या अनुदानाचे अर्ज सुरु आहेत. इतर जिल्ह्यासाठी अर्ज लवकर सुरु होतील यासाठी आमच्या वेब साईटला नियमित भेट देत राहा 

1 2 3Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button