अर्थविश्वट्रेंडिंगतंत्रज्ञानमहाराष्ट्र

‘गुगल पे’ वर मिळणार 1 लाखांपर्यंत पर्सनल लोन; प्रक्रिया जाणून घ्या! Instant Personal Loan On Google Pay

Instant Personal Loan On Google Pay : अनेकदा पैशांची गरज भासल्यास आपण पर्सनल लोनचा पर्याय निवडतो. अशा वेळी ते त्वरित मिळावं अशी आपली अपेक्षा असते.

Instant Personal Loan On Google Pay : जर तुम्हाला अचानक लाखभर रुपयांची गरज असेल तर आता चिंता करण्याचं कारण नाही. जर तुम्ही गुगल पे (Google Pay) वापरत असाल आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री क्लिअर असेल तर तुम्हाला केवळ एका मिनिटांत एक लाख रूपयांपर्यंतचं पर्सनल लोन (Personal Loan) मिळू शकतं. DMI Finance Limited नं गुगल पे सोबत डिजिटल पर्सनल लोन (Digital Personal Loan) ऑफर करण्याची सुविधा सुरू केली आहे.

जर तुम्ही Google Pay वापरत असाल तर तुम्हाला डबल बेनिफिट मिळेल. तुम्हाला Google Pay चं कस्टमर एक्सपिरिअन्स मिळेल. यासोबतच DMI Finance कडून तुम्हाला पर्सनल लोनही देण्यात येईल.

‘या’ ग्राहकांना मिळणार लाभ
Google Pay चा वापर करणाऱ्या सर्वच ग्राहकांनाया लोनचा लाभ घेता येणार नाही. जर तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तरच या सुविधेचा लाभ घेता येईल. या सुविधेअंतर्गत डीएमआय फायनॅन्स सर्व्हिसेसद्वारे घालण्यात आलेल्या अटी शर्थींनुसार प्री क्वालिफाईड एलिजिबल युझर्स ठरवले जातील. त्यांनाच या माध्यमातून लोन दिलं जाईल. जर तुम्ही याचे प्री अप्रुव्ह्ड कस्टमर असाल तर तुम्हाला Instant Loan Application रियल टाईममध्ये प्रोसेस केलं जाईल आणि बँक अकाऊंटमध्ये तात्काळ पैसे जमा होतील.

३६ महिन्यांसाठी मिळणार कर्ज
या सुविधेचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त एक लाख रूपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता. तसंच ही रक्कम फेडण्यासाठी तुम्हाला ३६ महिने म्हणजेच तीन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळेल. या करारानुसार सध्या इन्स्टन्ट लोनची सुविधा १५ हजारांपेक्षा अधिक पिन कोडसाठी सुरू केली जात आहे.

कसा घ्याल फायदा?

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाइलवर Google Pay ओपन करा.
  • त्यानंतर Pre Approved Loan साठी तुम्ही एलिजिबल असाल तर Promotions च्या खाली Money हे ऑप्शन दिसेल.
  • या ठिकाणी तुम्हाला Loan या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
  • आता Offers चा एक ऑप्शन खुला होईल. यात DMI हा ऑप्शन दिसेल.
  • यामध्ये कोणती व्यक्ती कमीतकमी किती रक्कम आणि सर्वाधिक किती रकमेचं लोन घेऊ शकेल हे दिसेल. यासोबतच अन्य डिटेल्सही दिसतील.
  • यानंतर Application प्रोसेस पूर्ण करावी लागेल.
  • ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर Loan Approve झाल्यावर तुमच्या बँक खात्यात ती रक्कम येईल.

हे पण वाचा :

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button