महाराष्ट्रयोजनाव्यवसायव्हायरल

शेतकऱ्यांना मिळणार २ लाखाचा विमा! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-2022 संपूर्ण माहिती

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२१-२०२२ बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती व तसेच या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल.

राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास आता शासन मदतीसाठी धावले आहे.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2021-2022

अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी 1 डिसेंबर 2016 ते 30 नोव्हेंबर 2017 असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबविण्यात येत आहे.

या कालावधीसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. अपघात होणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येईल. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी 10 ते 75 या वयोगटातील सातबाराधारक असणे आवश्यक आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-2022

शेतकऱ्यांनी अर्जाच्या नमुन्यासाठी आपल्या नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अपघाताचा प्रसंग घडल्यास शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शासनाचे विमा सल्लागार प्राथमिक छाननी करून प्रस्ताव विमा कंपनीकडे अंतिम मंजूरीसाठी पाठवितात.

या योजनेअंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी कृषी विभागाकडून सहाय्य करण्यात येते. शासनाने जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीला अधिकृत विमा सल्लागार म्हणून नेमले असून त्यांचा टोल फ्री क्रमांक 18002333533 आहे. प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी कोणत्याही खाजगी व्यक्ती, मध्यस्त किंवा दलालाचे सहाय्य घेण्याची आवश्यकता नाही. शेतकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी समस्या असल्यास कृषी विभाग किंवा सल्लागार कंपनीशी संपर्क साधावा.यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याचा या योजनेशी संबंध राहणार नाही. या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील वर नमूद केलेला कोणताही १ सदस्य.

योजनेचे नावगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील शेतकरी
उद्दिष्टशेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
वेबसाईटkrishi.maharashtra.gov.in
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आवश्यक कागदपत्रे कोणती?

  1. ७/१२
  2. ६क
  3. ६ड(फेरफार)
  4. एफ. आय. आर.
  5. पंचनामा
  6. पोष्ट मार्टेम रिपोर्ट
  7. व्हिसेरा रिपोर्ट
  8. दोषारोप
  9. दावा अर्ज
  10. वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
  11. घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटोसह) १३)वयाचा दाखला
  12. तालुका कृषि अधिकार पत्र
  13. अकस्मात मृत्यूची खबर
  14. घटनास्थळ पंचनामा
  15. इंनक्वेस्ट पंचनामा
  16. वाहन चालविण्याचा वैध परवाना
  17. अपंगत्वाचा दाखला व फोटो
  18. औषधोपचारा चेकागदपत्र
  19. अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

या कारणाने अपघात झाल्यास मिळणार विमा

विमा संरक्षण असताना रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू व अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

लाभ कधी मिळणार नाही

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या नशेत असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी यांचा विमा संरक्षणात समावेश नाही.

विमा संरक्षण योजनेत सहभागी होण्यासाठीची पात्रता

राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकऱ्यांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. विम्याचा लाभ हा 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यालाच मिळणार आहे. यापुर्वी ज्याचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचा सातबारा असणे आवश्यक होते. मात्र, यामध्ये बदल करुन जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे शेतजमिन असली तरी सहभागी होता येणार आहे.

अपघात विमा मिळण्याची प्रक्रिया

अपघात झाल्यास पोलिस पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, सातबारा, आठ ‘अ’, 6 क, 6 ड, मृत्यृ प्रमाणपत्र, ज्यांचा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्याचे वारसा प्रमाणपत्र, वारसा अर्जदार इत्यादी कागदपत्रे ही कृषी विभागात जमा करावी लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम ही अदा केली जाते.

अपघातानुसार ठरवण्यात आली आहे रक्कम

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. (Gopinath Munde changes farmer accident insurance scheme, gets financial assistance after accident)

योजनेसंबंधित महत्वाची कागदपत्रेडाउनलोड
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अर्ज DOWNLOAD इथे टच करा
योजनेचा शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा इथे टच करा
या योजनेचे आणखी शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा इथे टच करा
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra

Gopinath Munde Apghat Vima Yojana FAQ

प्रश्न १. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ कधी मिळेल?

उत्तर – विमा संरक्षणात रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, हिस्त्र जनावरांनी खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल आणि अन्य कोणतेही अपघातांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रश्न २. Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana लाभ कधी मिळणार नाही?

उत्तर – नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी,

जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रश्न ३. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत किती रुपये मिळतील?

उत्तर – अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे. (Gopinath Munde changes farmer accident insurance scheme, gets financial assistance after accident)

हे पण वाचा –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button