दुष्काळात तेरावा..अवकाळीचा फटक्यानंतर शेतकऱ्यांसमोर आणखी एक डोकेदुखी ; खतांच्या किंमतीत वाढ
Fertilizer Price Hike : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उरलं सुरलं पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपडतो आहे. मात्र अवकाळीच्या फटक्यानंतर आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर आली आहे. खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
यामुळे खतांच्या किंमतीत वाढ
खताला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातीव किंमती वाढल्या असल्याचं सांगितलं जातं. त्याचा थेट परिणाम भारतातील खताच्या किंमतीवर झाल्याचंही काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं. कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण लॉकडाऊनमध्ये शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगलीच खालावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर केंद्राने ही किंमत वाढ काही अंशी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
खताचे नाव– आधीचा दर– नवीन किंमत
डीएपी –1200– 1200
युरिया– 266– 266
10.26.26 –1300– 1470
12.32.16 –1300– 1470
20.20.0.13– 1150– 1250
15.15.15– 1250– 1400
तर अश्याप्रकारे खतांच्या किमतीत मोठी वाढ केलेली दिसून येत आहे. याबाबत आपले मत कमेंट्स मध्ये कालवा. धन्यवाद.