अर्थविश्वमनोरंजनमहाराष्ट्रयोजना

अतिवृष्टीचा निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा; लवकरच “या” 7 तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मिळणार मदत । नुकसान भरपाई यादी पहा

जिल्ह्यांमधील (districts) अतिवृष्टी लोकांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाने (government) मंजुर करून जिल्हा प्रशासनाला दिला आहे. सदर निधी जिल्हा प्रशासनाने सातही तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यात पाठवला आहे. त्यामुळे निधीचे वितरण लवकरच संबंधित नुकसानग्रस्तांच्या बॅंक (Bank) खात्यात करण्यात येणार असून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी –

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ३९९ गावे बाधित झालेली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे कपडे, घरातील साहित्य, अन्न धान्य व इतर नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी उद्भवलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना, जखमी व्यक्तींना लगेच मदत देणे आवश्यक असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते.

??नुकसानग्रस्त तालुक्यांचे नाव पाहण्यासाठी सर्वात खाली जा??

नुकसानग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला असून त्याचे आता लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

शासनाने दिली अशी मदत –

नैसर्गिक आपत्तीमुळे घरे उध्वस्त झाल्यामुळे कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तूंसाठी अर्थ सहाय्य – २ कोटी ५६ लाख ५ हजार देण्यात येईल. तसेच अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे जणावरांचा मृत्यू झालेल्यांना एसडीआरफच्या दराने ३९ कोटी २८ लाख तर वाढीव दराने १२ कोटी ३४ लाख रुपयांची अशी एकूण ८ कोटी ५६ हजार ६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्‍यांसाठी एसडीआरफच्या दराने ८ कोटी ५६ लाख ६ हजार तर वाढीव दराने मदत देण्यासाठी १० कोटी ४३ लाख ५६ हजार रुपयांचे असे एकूण १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. खरडून गेलेल्या शेती नुकसानीसाठी ३१ कोटी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

हस्तकला, हातमाग कारागिर, बारा बलुतेदार यांना एसडीआरफच्या दराने १६ लाख तर वाढीव दराने १ कोटी ८४ लाख अशी एकूण २ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर व पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांसाठी १ कोटी ३० लाख ५० हजार तर टपरीधारकांसाठी २३ लाख ५० हजार, कुक्कुटपपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ लाख, मदत छावणीमध्ये आश्रय घेतलेल्यांसाठी ४ कोटी ८३ लाख मदत जाहीर करण्यात आली आहे.

??नुकसानग्रस्त तालुक्यांचे नाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा ??

????

You have to wait 30 seconds.

कृपया ३० सेकण्ड वाट पहा, व त्यानंतर येणाऱ्या लिंकवर क्लिक करा.

1 2Next page

Related Articles

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button