महाराष्ट्रयोजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ३० कोटी निधी आला, असा करा अर्ज | Annasaheb Patil Karj Yojana

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल. आणि आर्थिक पाठबळ मिळत नसेल .तर आता ही योजना आणि आमची ही पोस्ट मित्रांनो, तुम्हाला एक प्रकारे आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ साठी 30 कोटी रुपये निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

आजच्या या लेखामध्ये आपण “अण्णासाहेब पाटील कर्ज योजना” या बाबत ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल .तर त्यासाठी कोणते नियम व अटी आहेत. त्यानंतर या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील ?योजनेचा फॉर्म कुठे व कसा भरावा ? योजनेमध्ये किती रुपयाचे कर्ज देण्याची तरतूद आहे ? योजनेचा नवीन सरकारचा जीआर काय सांगतो? अशा प्रकारे अनेक तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये तुम्हाला मिळतील .तर लेख पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा .आणि आणखीन काही तुमची तक्रार असल्यास खालील कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून आमच्याशी संपर्क साधू शकता.

मित्रांनो तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर या लेखाच्या शेवटी डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात परंतु त्या आधी हा लेख पूर्ण वाचा

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेले लाभार्थी

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुषांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त 50 तर महिलांसाठी 55 वर्ष इतकी आहे.
  2. लाभार्थ्याचे आर्थिक उत्पन्न हे वार्षिक आठ लाख असणे गरजेचे आहे.
  3. कर्जाची रक्कम दहा लक्ष एवढी असेल आणि व्याजदर द.सा.द.शे.12 टक्के एवढा असेल .यामधील तीन लाख रुपयांपर्यंतचा व्याज रकमेचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ द्वारे करण्यात येईल. अर्ज केल्यानंतर सात दिवसाच्या आत तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. आणि त्यावरील प्रतिक्रिया लाभार्थ्याला कळवली जाईल .
  4. योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो वेबसाईट वर अपलोड करणे गरजेचे आहे. त्याची मुदत सहा महिने एवढी आहे.
  5. या योजनेची आणखीन एक अट अशी की ,अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेऊन जर तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल तर, तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सौजन्य असा बोर्ड लावावा लागेल.
  6. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  7. ही योजना फक्त मराठ्यांसाठी नसून इतर कोणत्याही जातीच्या उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतील .फक्त त्याच्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नसावे.

अशाप्रकारे मित्रांनो तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तुमचा व्यवसाय सुरु करू शकता .आणि स्वतःचे विश्व निर्माण करू शकता. या योजनेबद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असल्यास तुम्ही येथे कमेंट करू शकता .कमेंट मधील प्रश्नाचे पूर्णपणे निवारण केल्या जाईल.

(Annasaheb patil loan application form, annasaheb patil loan scheme information, annasaheb patil loan scheme pdf download, mahamandal loan process, अण्णासाहेब पाटील कर्ज कागदपत्राची यादी ,अण्णासाहेब पाटील माहिती, कर्ज योजना, loan scheme maharashtra, annasaheb patil lian scheme in marathi, )

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे

  • आधार कार्ड ( पुढील आणि मागील दोन्ही बाजूचे )
  • रहिवासी पुरावा.
  • उत्पन्नाचा पुरावा.
  • जातीचा दाखला.
  • प्रकल्प अहवाल.

ही कागदपत्रे तुम्हाला अण्णासाहेब पाटील योजनेचा अर्ज भरण्यासाठी महत्त्वाची आहेत .ही तुम्हाला महास्वयम या वेबसाईटवर अपलोड करावी लागते .तुमचा अर्ज भरल्यानंतर ही कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट केला की तुमचा अर्ज कर्जासाठी काही दिवसातच स्विकारला जातो. तसा तुम्हाला मेसेज येतो.(anna saheb patil yojana in marathi)

कसा करावा या योजनेसाठी अर्ज?

खरोखरच तुम्हाला तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल आणि स्वतः स्वतःचे मालक बनायचे असेल तर ही संधी गमावू नका या योजनेसाठी आताच अर्ज दाखल करा अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर तुम्ही क्लिक करून महास्वयम या वेबसाईटच्या पोर्टलवर पोहोचाल तेथून तुम्ही अर्ज करू शकता .

.


finger down

.

अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या काही तक्रारीसाठी तुम्ही खालील दिलेल्या ग्राहक क्रमांकावर संपर्क करू शकता.

टोल फ्री क्रमांक – 1800 120 8040

FAQ – अण्णासाहेब पाटील कर्ज योजना वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न

प्रश्न १. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?

उत्तर – या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुषांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त 50 तर महिलांसाठी 55 वर्ष इतकी आहे.

प्रश्न २. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे?

उत्तर – लाभार्थ्याचे आर्थिक उत्पन्न हे वार्षिक आठ लाख असणे गरजेचे आहे.

प्रश्न ३. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हि योजना कोणत्या जातीसाठी आहे?

उत्तर – ही योजना फक्त मराठ्यांसाठी नसून इतर कोणत्याही जातीच्या उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतील .फक्त त्याच्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नसावे.
1 2 3Next page

Related Articles

2 Comments

  1. मला लोन मिळेलका मला बकरीपालन करायचे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button