तंत्रज्ञानमनोरंजनमहाराष्ट्रव्यवसाय

आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे, मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी संमेलन म्हणजेच ऍग्रो व्हिजन.

समृद्ध शेतीचे स्मार्ट व्हिजन म्हणजेच ऍग्रो व्हिजन l

भव्य कृषी प्रदर्शन , कार्यशाळा आणि परिसंवाद अशाप्रकारे तीन टप्प्यांमध्ये ॲग्रोव्हिजन पार पडणार आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना शिक्षित प्रोत्साहित व सबल करण्याच्या उद्देशाने सुरू झालेले ॲग्रोव्हिजन आता मध्य भारतातील सर्वात मोठे कृषिप्रदर्शन ठरले आहे. ॲग्रोव्हिजन चा हा बारा वर्षाचा दिमाखदार प्रवास आहे.

ऍग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री, मा.ना.श्री नितिन गडकरी व जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी.डी. मायी यांच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रोव्हिजन शेतकऱ्यांच्या जीवनात आणि एकूणच कृषी क्षेत्रात लक्षणीय बदल घडवीत आहे.

उत्पादन वाढीने देशांतर्गत व देशाबाहेर कृषी मालाची विक्री, आधुनिक तंत्रज्ञान प्रक्रिया , शेती संबंधित व्यवसाय अशा अनेक पैलूंवर सखोल मार्गदर्शन करणारे एकमेव कृषी संमेलन म्हणजे ऍग्रो व्हिजन.

कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण

 • विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय
 • विदर्भातील कृषी पर्यटनाची व्याप्ती
 • विदर्भातील कुकुटपालन संधी आणि आव्हाने .
  -बांबू लागवड संधी
  -कृषी सल्लागार , नवीन स्टार्टअप, प्रगत शेतकरी, यंत्रे ,अवजारे ,खते, औषधे ,बियाणे यांना एकाच ठिकाणी बघण्याची संधी.

कार्यशाळेमध्ये नेमकं काय ?

 • कृषी कचऱ्यातून जैवइंधनाचे निर्मिती
  -संत्रा आणि केळी अशा बागायतदार शेतकऱ्यांसाठी निर्यात दर्जाचे उत्पादन
  -बांबू लागवड ,ऊस शेती ,कृषी पर्यटन इत्यादी क्षेत्रातील संधी.

परिसंवादामध्ये नेमक काय ?

-विदर्भातील दूध व्यवसायाच्या संधी.

-नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान .

-विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय.

आगळंवेगळं असं म्हणजे विशेष पशुधन दालन.

ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन केव्हा पार पडणार ?

24 ते 27 डिसेंबर 2021 रोजी
रेशीमबाग ग्राउंड, नागपूर येथे हे कृषी प्रदर्शन पार पडणार आहे.

समृद्ध शेतीचे स्मार्ट व्हिजन म्हणजेच ऍग्रो व्हिजन l

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button