महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात 3 मोठे बदल | land sell purchase in maharashtra
महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या (land sell purchase in maharashtra) नियमात काही बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचं परिपत्रक नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी जुलै 2021 मध्ये जाहीर केलंय. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले आहेत.
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधीमंडळ अधिवेशनात या परिपत्रकाविषयी बोलताना म्हटलं, “तुकडेबंदी कायद्यामुळे शेतकऱ्याची अडचण झाली आहे. बागायत शेतीवाल्या शेतकऱ्याला 20 गुंठे तर कोरडवाहू शेतकऱ्याला 2 एकरपेक्षा कमी जमी विकता येत नाही.
“1, 2 गुंठे जमीन विकता येत नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी काढावी लागते. शेतकऱ्याचं दृष्टीनं ही अडचणीची बाब ठरली आहे.”
अनेक शेतकऱ्यांनी तर हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली. पण, हे परिपत्रक रद्द केलं जाणार नाही, असं मत महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं.
हे आहेत शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झालेले ३ मोठे बदल

जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
- नवीन नियमांनुसार महाराष्ट्रात 1, 2, 3 अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा आधी ले-आऊट करणं आवश्यक आहे.
- तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागासाठीच्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन ले-आऊट न करता तुम्हाला खरेदी करता येणार नाहीये.
- नव्या नियमांनुसार शेतजमीन कशी खरेदी करायची, या विषयावर बीबीसी मराठीनं एक खास चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यामुळे याविषयाशी संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला पुढील व्हीडिओत पाहायला मिळेल.
- दरम्यान, तुम्ही जर शेतजमिनीची खरेदी किंवा विक्री करणार असाल तर तुम्हाला हे नवीन नियम माहिती असणं आवश्यक आहेत.
- काय आहेत नेमके हे बदल, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.
सरकारी पत्रकात काय म्हटलंय? land sell purchase in Maharashtra
गेल्या काही वर्षांत जमिनीच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत.
पण, महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. म्हणजे काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही.
असं असतानाही अगदी एक, दोन, तीन गुंठे असे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून त्याची दस्त नोंदणीही होत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं होतं.
त्यामुळे मग राज्य सरकारनं या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.
या चौकशीनंतर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं एक आदेश जारी केला आहे. त्यात राज्यातील सर्व जिल्हा दुय्यम निबंधकांना काही सूचना केल्या आहेत.
.
हे आहेत शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात झालेले ३ मोठे बदल

जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
.